Books Why should be a homeopath?

Why should be a homeopath?

Ghatancha Raja (Marathi)
आदित्य होमोपॅथिक हॉस्पिटल अंड हीलींग सेंटर
 
ऑलोपॅथी एम. डी. पदवी संपादन अन ऑलोपॅथिचीच प्रॅक्टिस करणारे सॅम्युएल हॅनेमान हे 'होमिओपॅथी' या  औषधशास्त्राचे जनक. एक  ऑलोपॅथीचा डॉक्टर 'होमिओपॅथीचा' जनक आहे, यावर पटकन कोणाचा विश्वास बसणार नाही.
 
डॉ. हॅनेमान यांनी आपलं ऑलोपॅथीच शिक्षण पूर्ण केल्यावर रुग्णांवर उपचार करायला सुरुवात केली. पण हे करत असताना रुग्णांच्या शरीराची होणारी हेळसांड, त्यांना होणारा मानसिक त्रास, शस्त्रक्रियेच्या वेळी होणारी वेदना, त्यांच्या जीवाची जोखीम यामुळे ते स्वतः व्यथित झाले. मात्र, त्यामुळे स्वस्थ बसले नाहीत.
 
रुग्णांना वेदनामुक्त उपचार कसे देता येतील, त्यावर त्यांनी संशोधन सुरू केलं. अन याच संशोधनातून 'होमिओपॅथीचा' जन्म झाला. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन डॉ. अमरसिंह निकम यांनी होमिओपॅथी हॉस्पिटल सुरू केलं. होमिओपॅथीच्या  प्रचार अन प्रसारासाठी 'मिशन होमिओपॅथी ऑर्गनायझेशन' च्या वतीने अहोरात्र झटत आहेत. याचाच एक भाग म्हणजे हा पुस्तक प्रपंच!
 
'होमिओपॅथ का व्हावे' ? असा प्रश्न पडणाऱ्यांसाठी हे पुस्तक आहे. त्याचबरोबर होमिओपॅथीवर प्रेम करणाऱ्यांसाठी, हे औषधशास्त्र जाणून घेणाऱ्यांसाठी, याविषयीची असलेले सर्व समज - गैरसमज, शंका - कुशंका दूर करण्यासाठी, होमिओपॅथीच्या औषधांची ताकद  समजावण्यासाठी हे पुस्तक आहे.
 
जलद, तात्काळ अन् वेदनामुक्त उपचारपद्धतीत विना इंजेक्शन, विना सलाईन अन् विना ऑपरेशन, दुर्धर, असाध्य आजारातून बरे झालेल्या रुग्णांचे अनुभव या पुस्तकात आहे.
 
आपलं अवघ आयुष्य होमिओपॅथीच्या प्रचार प्रसारासाठी व्यतीत करणाऱ्या डॉ. अमरसिंह निकम यांच्या अथक संशोधनातून, अभ्यासातून,  चिकित्सेतून हे पुस्तक तयार झालं आहे. क्लासिकल होमिओपॅथीचा अभ्यास करणाऱ्या  प्रत्येकासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल हे नक्की....

News and Update
Online Treatment
New Patient Registration
 
New Workshop Registration
 
Courier Service